लघु उद्योग भारती रायगड आणि ITI यांच्यात उद्योग प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार (MOU) सम्पन्न

Organised by:
लघु उद्योग भारती रायगड और ITI
Event Date: 08/03/2025
Raigarh,
MAHARASHTRA

लघु उद्योग भारती रायगड आणि ITI यांच्यात सामंजस्य करार (MOU) संपन्न

लघु उद्योग भारती ही संपूर्ण भारतभर कार्यरत असलेली MSME उद्योग समूहांची एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी कार्य करते. रायगड शाखेच्या पुढाकाराने आणि ITI संस्थेच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. या करारामुळे ITI विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या कौशल्यात वाढ होऊन भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

MOU साठी आयोजित कार्यक्रमात लघु उद्योग भारतीचे पदाधिकारी आणि ITI चे संयुक्त आयुक्त श्री. सुर्यवंशी उपस्थित होते. प्रामुख्याने, ITI मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण आणि वनवासी भागांतील असतात, ज्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राचा फारसा अनुभव नसतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक ठरणार आहे. आजच्या औद्योगिक स्पर्धेत ITI विद्यार्थ्यांना त्वरित नोकरी मिळणे कठीण होते, त्यामुळे लघु उद्योग भारतीच्या सहकार्याने त्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि त्यांनी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात वापरण्याची संधी मिळेल.

हा करार विद्यार्थ्यांसाठी केवळ एक प्रशिक्षण संधी नसून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित उद्योगांमध्ये नोकरी मिळण्याची दारे देखील खुली करू शकतो. विशेष म्हणजे, लघु उद्योग भारतीचे माननीय अध्यक्ष श्री. मारुती पवार सर हे स्वतः ITI विद्यार्थी राहिलेले आहेत, त्यामुळे हा उपक्रम त्यांच्यासाठीही अत्यंत अभिमानाचा आहे.

हा सामंजस्य करार अनेक तरुणांच्या भविष्य उभारणीस मदत करेल आणि औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल.

धन्यवाद,
स्वप्नेश विचारे,
सह सचिव, रायगड.

SUBSCRIBE NEWSLETTER

Stay Updated with
Latest News

Joined 50,000+ subscribers. No spam, unsubscribe anytime.
Subscribe to our newsletter and never miss breaking stories, trending topics, and exclusive insights.

Email Address


LUB is India's largest MSME welfare organisation with a grassroot level presence and engagement from all members from Kashmir to Andaman and Nicobar Islands and from Assam to Gujarat. Join us to explore the most expansive industry network in India.
Subscribe to our newsletter
The latest news, articles, and resources, sent to your inbox weekly.
© 2026
Laghu Udyog Bharati. All rights reserved.

Website by Creativity Please